तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांना नजरकैदेत ठेवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश
नारदा घोटाळा !
कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना कारागृहात ठेवण्याऐवजी त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. फिरहाद हकीम, सुब्रत बॅनर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी अशी या चौघांची नावे आहेत. अंतरिम जामीनासाठी हे प्रकरण दुसर्या खंडपिठाकडे पाठवण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Narada case: Calcutta high court orders house arrest for all 4 politicians https://t.co/0KP2wTAzpt
— Hindustan Times (@HindustanTimes) May 21, 2021