खांडवा येथे १७ वर्षे जुन्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्याचा अयशस्वी प्रयत्न !
खांडवा (मध्यप्रदेश) – येथे राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला असता ती चालूच झाली नाही. तिला धक्काही मारण्यात आला, तरीही ती जागची हलली नाही. यामुळे सरकारचे हसे झाले आहे. या घटनेविषयी विजय शहा म्हणाले की, ही रुग्णवाहिका वर्ष २००४ ची होती.अधिकार्यांनी आधीच तपासणी करायला हवी होती.