कोरोनामुळे बेरोजगारीचा दर उच्चांकी स्तरावर !

नवी देहली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बेरोजगारीचा दर १४.३४ टक्के इतक्या उच्चांकी स्तरावर गेला आहे, असे निरीक्षण ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. दळवळण बंदीमुळे गावांमध्ये नोकरीचे संकट वाढत चालले आहे. गेल्या आठवड्यात ग्रामीण भागांत बेरोजगारीचा दर ७.२९ टक्के, तर शहरी भागात तो ११.७२ टक्के इतका होता.