अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !
|
कोरोना, चक्रीवादळ आणि आता हिमनग वितळून समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, ही सर्व आपत्काळाची लक्षणे आहेत ! अशा भीषण आत्पकाळाला सामोरे जाता यावे, यासाठी आता तरी साधना करा !
अँटार्क्टिका – येथे एक महाकाय हिमनग वितळला आहे. हा हिमनग स्पेनच्या माजोरका बेटाच्या आकाराइतका आहे. उपग्रह आणि विमान यांद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून हे दृश्य दिसून आले. हा जगातील आतापर्यंतचा सर्वांत महाकाय बर्फाचा तुकडा आहे, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अँटार्क्टिकामधील बर्फाचा एक मोठा तुकडा वितळला होता.
The world’s largest iceberg has calved from Antarctica over the past few days, a giant floating piece of ice close to 80 times the size of Manhattan https://t.co/0v7TmFsBp8
— CNN (@CNN) May 20, 2021
१. ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’नुसार हा हिमनग अँटार्क्टिकामधील रॉनी आईस शेल्फच्या पश्चिमेकडून तुटला असून तो वेडेल समुद्रात तरंगत आहे. हा बर्फाचा तुकडा १७० किलोमीटर लांब, तर २५ किलोमीटर रुंद आहे.
२. काहींच्या मते हे जागतिक तापमानवाढीच्या धोक्याचे लक्षण आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत चालला असून समुद्राची पातळी सतत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे मुंबईसारखी किनारी भागातील शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
४. अँटार्क्टिकामधील तापमानवाढीमुळे बर्फाच्या चादरीही हळूहळू वितळू लागल्या आहेत. हिमनद्याही वितळायला आता आरंभ झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.
५. वर्ष १८८० पासून ते आतापर्यंत समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ सरासरी ९ इंच झाल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. यामागील कारण ‘ग्रीनलँड आणि अँटार्क्टिका येथील वितळलेले बर्फ’, हे आहे.
६. ‘नेचर मॅगझिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जगात दुसर्याही ठिकाणचे हिमनग वेगाने वितळत आहेत. ही सगळी परिस्थिती पहाता वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, अशाच प्रकारे जर हिमनग वितळत राहिले, तर सर्वच किनार्यालगतची शहरे ही पाण्याखाली जाऊन नष्ट होऊ शकतात.