गोव्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसींचा पुढचा साठा जून महिन्यात
इतर राज्यांतील लोक गोव्यात लस घेण्यासाठी नोंदणी करत असल्याचे राज्यातील लसीकरण अधिकार्यांनी शासनाच्या नजरेस आणले
पणजी, २० मे (वार्ता.)- १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोनावरील लसीचा पुढचा साठा जून महिन्यात राज्यात येणार, अशी माहिती मिळाली आहे. पुढच्या साठ्यामध्ये जवळपास ३६ सहस्र डोस येणार आहेत. या वयोगटातील इतर राज्यांतील काही जण लसीकरणासाठी नोंदणी करत असल्याचे गोवा राज्यातील लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी शासनाच्या नजरेस आणून दिले आहे. ते म्हणाले की, गोवा राज्य या लसींची खरेदी करत असल्याने याविषयी शासन योग्य ती कारवाई करू शकेल.