रासायनिक खतांची किंमत कमी करा ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना
कोल्हापूर – कोरोना महामारीच्या कालावधीत रासायनिक खतांची किंमत वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खतांच्या किंमत ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेतीची कामे जरी चालू असली, तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकर्यांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे रासायनिक खतांची किंमत कमी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे रासायनिक आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.
खतांची किंमत वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. खत आणि इंधन यांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माने यांनी पत्राद्वारे केली आहे.