सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार शिबिरात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
सोलापूर – द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळ चालू झाला असून त्या पाठोपाठ तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता दिसत आहे. या काळात सत्त्वगुणी समाजाचे अर्थात् सज्जन, साधक आणि संत यांचे रक्षण करता यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड येथील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन प्रथमोपचार प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ १५६ धर्मप्रेमींनी लाभ घेतला. शिबिराचे सूत्रसंचालन कु. रश्मी चाळके यांनी केले.
या वेळी शिबिरार्थींना प्रथमोपचार पेटी आणि त्यातील साहित्याविषयी माहिती देण्यात आली, तसेच नाडी आणि श्वास यांची तपासणी कशी करावी ? डोक्याला जखम झाल्यास ‘हेड बँडेज’ कसे करावे ? आदी विषयांवर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्नेहा भोवर यांनी मार्गदर्शन केले. काळानुसार प्रथमोपचार शिकणे का आवश्यक आहे ? याविषयी, तसेच आपत्कालीन स्थितीत प्रथमोपचार कसा करावा ? याविषयीही शिकवण्यात आले.
विशेष
अचानक चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर कशा प्रकारे प्रथमोपचार करायचे ? याचे प्रात्यक्षिक शिबिरार्थींना ऑनलाईन दाखवण्यात आले.
अभिप्राय
|