‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधिकेला फुलांची सुंदर वेणी देणे’, हे ईश्वराचेच नियोजन असण्याच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती !
‘१६.१०.२०१८ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू या चेन्नईहून गोवा येथील रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘रामनाथीहून तुम्हाला काय आणू ?’’ मी पटकन म्हणाले, ‘‘तुमची इच्छा !’’ १९.१०.२०१८ या रात्री श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू चेन्नईला परत आल्या, तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी अधीर झाले होते. त्या आतमध्ये आल्या अन् मला फुलांची एक सुंदर वेणी देऊन म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरुदेवांनी पाठवली आहे.’’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. माझ्या मनात विचार येऊ लागले, ‘आता या वेणीचे काय करायचे ? छान साडी नेसून आणि ती वेणी माळून छायाचित्र काढायचे का ?’ नंतर मला वाटले, ‘स्वतः काही ठरवण्यापेक्षा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना विचारूया.’ मी दुसर्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना वेणीविषयी विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘श्रीकृष्णाच्या चित्राजवळ ठेवा.’’ मी माझ्या मनातील इच्छा त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘ती वेणी तुमचीच आहे. तुम्हीच ती माळा.’’ मी ती वेणी शीतकपाटात ठेवली.
दोन दिवसांनंतर, म्हणजे २१.१०.२०१८ या दिवशी माझ्या सासर्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंबीय एकत्र आले होते. त्या वेळी पुन्हा माझ्या मनात द्वंद्व निर्माण झाले, ‘ती वेणी देवाला वाहायची कि स्वतः माळायची ?’ मी प्रार्थना केली अन् ती वेणी स्वतः माळली. त्या वेळी मला जाणवले, ‘देवाने मला ती वेणी सजण्यासाठी नाही, तर मला आध्यात्मिक लाभ होण्यासाठी पाठवली आहे.’ प्रारंभी मला डोक्यावर थोडा जडपणा जाणवला. नंतर माझ्या मनात भाव होता, ‘ज्याप्रमाणे श्रीकृष्ण कालियावर (कालियामर्दन करण्यासाठी) उभा होता, त्याप्रमाणे श्रीकृष्ण माझ्या डोक्यावर उभा आहे, जणू तो म्हणत आहे, ‘तुझा अहं आता माझ्या नियंत्रणात आहे.’ गेल्या काही दिवसांपासून मला आध्यात्मिक त्रास होत होता. देवाने असे काही नियोजन केले की, त्यामुळे मला आध्यात्मिक लाभ झाला. मला त्या दिवशी दिवसभर हलके आणि उत्साही वाटत होते. ‘यासाठी देवाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे मला कळत नाही. देवाच्या चरणी प्रार्थना आहे, ‘मला सदैव तुझ्या चरणकमली कृतज्ञताभावात रहाता येऊ दे.’
– सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई, तमिळनाडू. (२३.२.२०१९)
|