ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे किंवा चीनच्या घुसखोरीचे दायित्व कुणीच स्वीकारत नाही ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजपचे नेते

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – वर्ष २०१६ पासून अर्थव्यवस्था कोलमडत चालल्याविषयी, तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी रोखण्यात अपयश आल्याविषयी कुणीही दायित्व स्वीकारत नाही. एवढेच नव्हे, तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न केल्याविषयीचेही कुणी दायित्व स्वीकारले नाही, असे सांगत केंद्र सरकार कसलेच दायित्व स्वीकारत नसल्याची टीका भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीटद्वारे केली.

भारत एकटा पडण्याच्या मार्गावर !

डॉ. स्वामी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी चालू आहेत. अमेरिका आणि रशिया यांनी आपापसांतील वितुष्ट मिटवले असून लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून भारत आता एकटा पडण्याच्या मार्गावर आहे. हवे असेल, तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना विचारा.’’