कोल्हापूर शहरात म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

कोल्हापूर – जिल्ह्यात कोरानामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) ची लक्षणे आढळत आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात, तर काहींना घरीच उपचार चालू आहेत. यासंदर्भात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात झालेल्या बैठकीत तज्ञांनी केलेल्या सुचनेनुसार या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय झाला.

आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या टास्क फोर्सने या बैठकीत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकडे लक्ष द्या, अशी सूचनाही केली आहे. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे, डॉ. वासंती पाटील यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित हाते.