पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकार्यांशी साधला ‘ऑनलाईन’ संवाद !
नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान
मुंबई – देशातील कोरोनाच्या स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० मे या दिवशी विविध राज्यांतील जिल्हाधिकार्यांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला. यात महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राज्यशासनाचे विविध उपक्रम जिल्ह्यात कसे राबवले, याची माहिती पंतप्रधानांना दिली. याविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद, म्हणाले… https://t.co/2gIhhBijwp via @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) May 20, 2021
मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कोरोनाच्या विरोधातील लढ्याला यश आल्याचे या वेळी डॉ. भोसले यांनी आवर्जून सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते.