हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याच्यावर जालना येथे गुन्हा नोंद !
पुणे येथे काही मासांपूर्वी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ‘हिंदु समाज पूर्णपणे सडलेला आहे’, असे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे त्याने पुन्हा ट्विटरद्वारे हिंदु देवतांवर टीका करून जातीय तेढ निर्माण केली. आतातरी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
जालना – अलिगड मुस्लिम विश्वविद्यालयातील माजी विद्यार्थी नेता आणि हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ट्विटरवर हिंदु देवतांविषयी द्वेष निर्माण करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी येथील अंबड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
#NewsAlert | Complaint filed against Sharjeel Usmani in Maharashtra’s Jalna & Delhi. Complaint in Maharashtra reportedly converted into FIR.
Mohit Sharma with details. pic.twitter.com/OWEV8Y7Iu0
— TIMES NOW (@TimesNow) May 20, 2021
‘१७ मे या दिवशी उस्मानी याने ट्विटरवर श्रीरामाच्या नावाचा वापर करत तिरस्कार आणि द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केले आहे’, असा आरोप हिंदु जनजागरण मंचाचे श्री. अंबादास अंभोरे यांनी करून तशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान संहिता कलम २९५ (अ) अंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.