लस निर्यात करण्याच्या कारणांसंदर्भात अदर पूनावला यांचे स्पष्टीकरण
पुणे – लसींच्या उत्पादनाला आरंभ झाला, तेव्हा भारतामध्ये कोरोनाची लाट ओसरली होती; मात्र इतर देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव अधिक प्रमाणात होता. या परिस्थितीमुळे इतर देशांना लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अदर पूनावाला यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली. लसींचा पुरवठा करण्यासाठी इतर देशांना शब्द दिला असल्याचेही पूनावाला यांनी पत्रकात म्हटले आहे. भारताची लोकसंख्या अधिक असल्याने येथील लसीकरण पूर्ण होण्यास वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.