पू. माईणकरआजी यांनी देहत्याग केल्यावर त्यांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती !

वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी

सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. वैशाली मुद्गल

१. ‘१२.५.२०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता पू. माईणकरआजींचे दर्शन घेतांना ‘त्या भावावस्थेत झोपलेल्या आहेत’, आणि ‘त्या सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवले.

२. त्यांच्याकडे पाहून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू झाला.

३. ‘त्यांच्या छातीमध्ये पांढरा प्रकाश गोलाकार फिरत आहे आणि त्यांच्या सर्व शरिराभोवती पिवळ्या प्रकाशाचे कण आहेत’, असे मला दिसले.

४. वातावरण गारवा जाणवून चांगले वाटणे : दुपारी कडक ऊन असूनही वातावरणात गारवा जाणवत होता. नेहमी लादी उन्हाने तापलेली असते; पण आज लादीही गार वाटत होती. तेथे दर्शन घेण्यासाठी पू. होनपकाका आले होते. तेही म्हणाले, ‘‘आज पक्षी पुष्कळ आवाज करत आहेत आणि हवेतही गारवा जाणवत आहे. वातावरण चांगले वाटत आहे.’’

५. पू. आजींनी देहत्याग केल्यावर ‘पृथ्वी, आकाश आणि वातावरण यांतही चैतन्य अन् आनंद पसरला आहे’, असे जाणवले. त्यामुळे पू. आजींच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.’

– सौ. वैशाली मुदगल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक