चीनमध्ये ६३० उघूर मुसलमान इमाम अटकेत ! – मानवाधिकार संघटनेचा दावा

इस्रायलच्या विरोधात उभी ठाकणारी ५७ मुसलमान देशांची संघटना चीनकडून होणार्‍या उघूर मुसलमानांवरील अत्याचारांच्या विरोधात का बोलत नाही ?

बीजिंग (चीन) – ‘उघूर ह्यूमन राइट्स प्रोजेक्ट’कडून चीनमधील शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांचे इमाम आणि अन्य नेते यांच्यावरील अत्याचाराविषयी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात ‘चीनमध्ये वर्ष २०१४ पासून कमीतकमी ६३० उघूर इमाम आणि अन्य नेत्यांना अटकेत ठेवण्यात आले आहे’, असे सांगितले असून १८ मौलवींचा यात मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे.