राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्वराने शक्ती द्यावी ! – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड
परमेश्वराला साकडे घालतांना अहंकार आणि दिखाऊपणा सोडावा लागतो. तृप्ती देसाई यांची ही सिद्धता आहे ना ? असा प्रश्न नागरिकांना पडल्यास नवल ते काय !
पुणे – मागील वर्षी राज्यावर संकटामागून संकटे आली. या संकटातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला सुरक्षित बाहेर काढले. अजून किती संकटे येणार ? हे ठाऊक नाही; पण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षितपणे संकटातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी, असे साकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घातले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वृत्तसंकेतस्थळावर तृप्ती देसाई यांना उपरती झाली, हे चांगलच आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली गेली आहे.