दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट
|
‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ यानुसार ‘आधीच काँग्रेसवाला त्यात धर्मांध’, असे असल्यावर हिंदु धर्माचा अवमानच करणारच ! अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
दंतेवाडा (छत्तीसगड) – येथील किरंदुल पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिद्दकी सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक करण्याची बजरंग दल, हिंदु सेना आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मागणी केली आहे. अटक न केल्यास उग्र आंदोलन करण्याची चेतावणीही दिली आहे. सिद्दकी याने फेसबूकवर हिंदु धर्म आणि न्यायपालिका यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.