सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात नालेस्वच्छतेचे काम गतीने चालू ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त
सांगली, १९ मे (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात एकूण ५० लहान-मोठे नाले आहेत. वर्ष २०१९ च्या पुराचा अनुभव लक्षात घेता नाले तुंबून शहरात पाणी पसरू नये; म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात नालेस्वच्छतेचे काम गतीने चालू करण्यात आले आहे. नाल्यांमधील गाळ, कचरा बाजूला करून नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने चालू आहे. हे सर्व नाले १ जूनपूर्वी गाळमुक्त केले जातील, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकारांना दिली.
आयुक्त पुढे म्हणाले, ‘‘नाल्याच्या आजूबाजूच्या ‘बफर झोन’मध्ये काही मालमत्ता आणि बांधकामे आहेत. ज्या मालमत्ता आणि बांधकामे पुरामुळे बाधित होत आहेत, अशा सर्वांना महापालिका प्रशासनाकडून पुढील आठवड्यापासून पर्यायी जागा शोधण्याविषयी सूचित केले जाणार आहे.’’