पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार
पुणे – विनाकारण वाहनांवरून फिरणार्यांविरुद्ध ५०० रुपये दंड आकारणी आणि वाहन जप्तीची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलिसांना यासंदर्भातील अधिकार दिले असून दळणवळण बंदी संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहने परत देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.