अटकेनंतर बंगालचे २ मंत्री आणि १ आमदार प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात !
नारदा घोटाळा !राजकारण्यांना अटक केल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती बिघडते, हे नेहमीचेच झाले असून या आजारावरही आता प्रभावी ‘लस’ काढण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |
कोलकाता (बंगाल) – नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचे २ मंत्री फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी, तसेच आमदार मदन मित्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Minister Subrata Mukherjee, TMC MLA Madan Mitra and former party leader Sovan Chatterjee were admitted to SSKM hospital after medical complaints, officials said.https://t.co/XmUXb9bj33
— News18 (@CNNnews18) May 18, 2021
या तिघांना अटक केल्यानंतर जामीन मिळाला होता; मात्र कोलकाता उच्च न्यायालयाने रात्री तो रहित केल्याने त्यांना कारागृहात नेण्यात आल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. या तिघांसह तृणमूलचे नेते सोवन चटर्जी यांनाही अटक करण्यात आलेली आहे. चटर्जी पूर्वी भाजपमध्ये होते.