चक्रीवादळानंतर मुंबई येथे अरबी समुद्रात ४ जहाजे अडकली !
२ जहाजांमधील २१५ जणांना वाचवण्यात यश !
लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !
मुंबई – ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर मुंबईच्या अरबी समुद्रात भारताची ४ जहाजे अडकली आहेत. या जहाजांवर एकूण ६०० हून अधिक लोक असून यातील २१५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
१. मुंबईपासून १७५ किमी अंतरावर हिरा फिल्ड्सजवळ ‘बार्ज झ-३०५’ जहाजावर बचावकार्य चालू आहे. या जहाजावरील २७३ लोकांपैकी १७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
२. ‘बार्ज झ-३०५’ चे बचावकार्य ‘आय.एन्.एस्. कोलकाता’ आणि ‘आय.एन्.एस्. कोच्ची’ या नौदलाच्या लढाऊ जहाजांद्वारे करण्यात येत आहे. पुढील काही घंट्यांत सर्व लोकांना सुरक्षित काढले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
३. ‘बार्ज गाल कन्स्ट्रक्टर’वरील १३७ पैकी ३८ जणांना वाचवण्यात आले आहे, तर इतर २ जहाजांपर्यंत लवकरच साहाय्य पोचवले जाईल.
४. ‘सागर भूषण १०१’ आणि ‘बार्ज डड-३’ या २ जहाजांवर १९६ लोक अडकले आहेत.
५. ही दोन्ही जहाजे ‘पिवाव पोर्ट’पासून ५० ‘नॉटिकल मैल’ दक्षिण-पूर्वमध्ये अडकली आहेत. या दोन्ही जहाजांच्या बचावकार्यासाठी ‘आय.एन्.एस्. तलवार’ला पाठवण्यात आले आहे.