चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील संरक्षक कठडा कोसळला !
पुन्हा वादळ आल्यास समुद्राचे पाणी शहरात शिरण्याची भीती
मुंबई – चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८ मे या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे. याविषयी माहिती मिळताच मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. ‘पुन्हा वादळ आल्यास समुद्राचे पाणी शहरात शिरण्याची भीती आहे. त्यामुळे तुटलेल्या कठड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात येईल. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील सर्व समुद्रकिनारे निर्मनुष्य करण्यात आले असून मुंबईत पुन्हा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे’, असे सौ. पेडणेकर यांनी या वेळी सांगितले.