भिवंडी येथे १२ सहस्र जिलेटिनच्या कांड्या आणि ३ सहस्र ८ डिटोनेटर यांचा अवैध साठा जप्त !
अटक केलेल्या आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी
|
ठाणे, १८ मे (वार्ता.) – भिवंडी येथील कारीवली गावाच्या हद्दीतील खदानीच्या शेजारी असलेल्या एका कार्यालयात पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १२ सहस्र जिलेटिनच्या कांड्या आणि ३ सहस्र ८ इलेक्ट्रिक डिटोनेटर असे एकूण २ लाख ७ सहस्र रुपये किमतीचे स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुरुनाथ म्हात्रे (वय ५३ वर्षे) यांच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. त्यांना भिवंडी न्यायालयात उपस्थित केले असता २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
12000 explosive gelatin sticks & 3000 detonators seized near Mumbai; 2 arrestedhttps://t.co/76UeB8lkyD
— Republic (@republic) May 19, 2021