विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्व तिसर्या महायुद्धाकडे चालले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
‘येत्या काळात अनेक वैश्विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्व तिसर्या महायुद्धाकडे चालले आहे. ‘येत्या काळात ४७ लाख लोकांना स्थलांतर करावे लागेल’, असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाने ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’, असे वचन दिले आहे. आज विश्वात विज्ञानाच्या आधारे प्रगती होत आहे. या प्रगतीचा अध्यात्म किंवा धर्म हा पाया नसेल, तर ती प्रगती विध्वंसाकडे जाऊ शकते. त्यामुळे मानवाने आध्यात्मिक विकासावर लक्ष द्यायला हवे.