विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या वतीने शिरगुप्पी गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या औषधाचे वाटप
निपाणी (कर्नाटक) – विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरगुप्पी गावात रोगप्रतिकारक शक्ती औषधाचे वाटप करण्यात आले. विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संकटात गरजूंना घरपोच भोजन, भाजीपाला पोच करणे यांसह अग्निहोत्र, यज्ञ या माध्यमातून स्वामीजी नागरिकांना साहाय्य करत आहेत. या उपक्रमात हेल्पलाईनचे सागर श्रीखंडे, विकासभाई विश्वकर्मा यांचा पुढाकार होता. हे वाटप करतांना ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा कुंभार, उपाध्यक्ष प्रमिला रोड्डे यांसह अन्य उपस्थित होते.