निवृत्त भूमी अभिलेख अधिकार्‍याकडे ८८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

भ्रष्टाचार करणार्‍यांना वेळीच शिक्षा होत नसल्याने त्याचे फावते !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – भूमी अभिलेख विभागाचे तत्कालीन उपसंचालक बाळासाहेब वानखेडे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडे ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले. वानखेडे सेवानिवृत्त असून त्यांच्या पुणे शहर,  मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतील मालमत्ता आणि घरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया चालू आहे.