लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेत बालरोगतज्ञांची बैठक
सोलापूर, १७ मे (वार्ता.) – सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांची कोरोना संसर्गापासून दक्षता घेण्यासंदर्भात आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. त्यादृष्टीने १६ मे या दिवशी सोलापूर शहरातील सर्व बालरोगतज्ञांची एकत्रित बैठक महापालिकेमध्ये घेण्यात आली. लहान मुलांचे आरोग्य केंद्र येथे चालू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी ‘फिव्हर ओपीडी’ चालू करण्यात येणार आहे.
या बैठकीत उपायुक्त धनराज पांडे म्हणाले, ‘‘महापालिका प्रशासन आणि खासगी रुग्णालय कोरोनाचे निदान करण्यासाठी सिद्ध आहे, नागरिकांनी आपल्या मुलांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिकेच्या ‘फिव्हर ओपीडी’ येथे घेऊन यावे.’’