दळणवळण बंदीच्या काळात २५ दिवसांत पोलिसांनी १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

विनाकारण रस्त्यावर नागरिक

कोल्हापूर – दळणवळण बंदीच्या काळात अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांना हरताळ फासून विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांकडून कोल्हापूर पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले, जिल्ह्यात २ सहस्रांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी कार्यरत असून १२ फिरती वाहने कार्यरत आहेत. शहरात २० हून अधिक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. दंड वसूल करणे हा आमचा हेतू नसून नागरिक नियम पाळत नसल्याने आम्हाला कारवाई करावी लागत आहे.