DRDO चे कोरोनावरील औषध ‘२ डीजी’ हे रुग्णांना वापरण्यासाठी उपलब्ध !
नवी देहली – भारत सरकारची संस्था DRDO ने (‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ने) कोरोनावर शोधलेले औषध ‘२ डीजी’ हे औषध कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत ही माहिती देण्यात आली. डीआर्डीओच्या ‘इंन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायंसेस’ने हे औषध विकसित केले आहे. यामध्ये भाग्यनगरच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या संशोधकांचेही योगदान आहे. हे औषध पावडरच्या रूपात असणार आहे. हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व न्यून करते.
Rajnath Singh to release the first batch of DRDO’s 2DG Covid medicine today#Covid19 #Corona #COVIDMedicine https://t.co/F31V9k5uXg
— moneycontrol (@moneycontrolcom) May 17, 2021
किती डोस घ्यायचा ?
एका पाकिटात हा डोस मिळणार आहेत. ओआर्एस् जसे पाण्यात मिसळतात आणि पितात, तसेच कोरोना रुग्णाला ते प्यावे लागणार आहे. हे औषध दिवसातून २ वेळा घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी हे औषध ५ ते ७ दिवस घ्यावे लागणार आहे. याचे मूल्य अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. याचे साईड इफेक्ट आढळून आलेले नाहीत.