सद्गुरु बाळूमामा फाऊंडेशनच्या वतीने भुदरगड (जिल्हा कोल्हापूर) येथील कोरोना रुग्णांसाठी भोजन व्यवस्था !
आपत्काळात सद्गुरु बाळूमामा फाऊंडेशनसारख्या संस्था नागरिकांचा आधार आहेत. कोरोना रुग्णांना साहाय्य करणार्या संस्था अथवा संघटनांंमध्ये हिंदु संस्थांचाच सहभाग अधिक असल्याचे दिसते, हे विशेष !
कोल्हापूर – श्री सद्गुरु बाळूमामा फाऊंडेशनद्वारे भुदरगड येथील कोरोना रुग्णांसाठी भोजन पुरवण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रतिदिन २०० जणांना लाभ होत आहे. या उपक्रमासाठी देणगीदारांकडून रोख रक्कम, तसेच वस्तू स्वरूपात देणगी स्वीकारण्याची सुविधा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष आणि आदमापुरचे सरपंच विजयराव गुरव यांनी दिली. या वेळी फाऊंडेशनचे प्रकाश खापरे, सागर पाटील आणि गुंडोपंत पाटील, शिवप्रताप पाटील उपस्थित होते.