बारामती येथे डीझेल टँकरच्या अपघातानंतर अपघातग्रस्तांना साहाय्य करण्याऐवजी स्थानिकांनी चोरले डीझेल !
स्वार्थी वृत्तीची परिसीमा गाठलेला समाज ! यासाठी आपत्काळात भगवंताने रक्षण करण्यासाठी साधना म्हणजेच त्याची भक्ती करणेच आवश्यक आहे.
बारामती (पुणे) – बारामती औद्योगिक वसाहत येथून पाटस रोड कडे जाणार्या एका डीझेल टँकरचा १६ मे या दिवशी अपघात होऊन बारामती तालुक्यातील गोजुबावी गावातील एका नाल्यामध्ये तो टँकर पलटी झाला. त्यामुळे टँकरमधील सहस्रो लीटर डीझेल नाल्यामध्ये सांडले असून तो नाला ‘ओवरफ्लो’ झाला आहे; पण खेदजनक बाब म्हणजे दुर्घटनाग्रस्त टँकरच्या जखमींना साहाय्य करण्याऐवजी तेथील स्थानिक लोकांनी सांडलेले डीझेल गोळा करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली.
सौजन्य : ABP माझा