महिला पोलीस कर्मचार्यास दमदाटी केल्याविषयी असिफ बावा यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली महिला पोलिसांना दमदाटी करणे म्हणजे कायदा हातात घेण्यासारखेच झाले. हे अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यासमवेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
सांगली – शहरातील नळभाग येथील एका प्रार्थनास्थळासमोर काही लोकांमध्ये भांडणे चालू होती. ही भांडणे सांगली शहर पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस सोडवत होती. त्याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असिफ बावा यांनी जाऊन त्यांनी या महिला पोलिसाला दमदाटी केली, तसेच अवैधरित्या जमाव जमवून या महिला पोलिसाच्या विरोधात वातावरण निर्माण केले. त्यामुळे या महिलेने शहर पोलीस ठाण्यात असिफ बावा यांच्यासह अन्य लोकांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर असिफ बावा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.