ऐकण्याची वृत्ती, सेवेची आवड आणि चुकांविषयी गांभीर्य असलेला, ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा, गुजरात येथील चि. मोक्ष अजित संत (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मोक्ष संत हा आहे !

(‘वर्ष २०१७ मध्ये चि. मोक्षची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)

चि. मोक्ष संत

‘बडोदा येथील चि. मोक्ष अजित संत याची त्याची आई, आजी, आजोबा आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. वय १ ते ३ वर्षे

१ अ. ‘मोक्षचे उच्चार स्पष्ट आहेत. तो सर्व स्तोत्रे स्पष्ट म्हणतो.

१ आ. ऐकण्याची वृत्ती

१. मोक्षचे मित्र-मैत्रिणी त्यांच्या वाढदिवसाला ‘केक’ कापतात. त्यामुळे एकदा त्यालाही ‘त्याच्या वाढदिवसाला ‘केक’ कापावा’, असे वाटले; पण त्याला शास्त्र समजावून सांगितल्यावर त्याने ते ऐकले आणि केक कापण्यासाठी हट्ट केला नाही.’ – सौ. अंशू अजित संत (आई)

२. ‘एकदा त्याला नामजप लिहायला कागद दिला आणि नामजप लिहून दाखवायला सांगितले. तेव्हा त्याने पूर्ण कागदावर  नामजप लिहून दाखवला.’ – सौ. सुजाता गरुड (साधिका)

१ इ. सहनशीलता  

१. मोक्षला ताप आला किंवा पोटात दुखत असले, तरी तो रडत नाही. ‘त्याला काय होत आहे’, ते सांगतो आणि खेळत रहातो.’ – सौ. अंशू अजित संत

२. ‘एकदा खेळत असतांना त्याचे बोट दुखावले गेले, तरी ते त्याने शांतपणे सहन केले.’ – सौ. सुजाता गरुड

२. वय ४ ते ६ वर्षे

२ अ. साहाय्य करणे : ‘मोक्ष भोपाळला आजोळी येतो. त्या वेळी तो माझ्यासमवेत घरातील सर्व कामे करतो. मला पूजेसाठी फुले आणून देतो. तो माझ्यासमवेत पूजाही करतो.’- सौ. संध्या आगरकर (मोक्षची आजी)

२ आ. प्रगल्भ बुद्धी

१. ‘मोक्षला कोणतेही नवीन खेळणे आणून दिले की, तो ‘त्या खेळण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून कसे खेळता येईल ?’, याचा विचार करतो. आम्ही त्याला एक ‘रेल्वे’ गाडी आणली आहे. तो त्या गाडीच्या रूळांचे धनुष्य-बाण बनवून खेळतो. तो ४ वर्षांचा असल्यापासून खेळण्याच्या ‘ब्लॉक्स’मधून विविध वस्तू बनवतो.

२. एकदा तो ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाला बसला होता. तेव्हा त्यात त्याने ‘स्वभावदोषांचे लिखाण कसे करायचे ?’  हे ऐकले आणि माझ्याकडून समजून घेतले.

३. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ‘६ वर्षांच्या मुलांनीही जप शोधायला शिकले पाहिजे’, असे सांगितल्याचे समजल्यावर त्याने जप शोधणे शिकून घेतले.

४. मोक्षला चित्रकलेची आवड आहे. तो आश्रमाचे चित्र काढतो आणि त्यावर केशरी ध्वज दाखवून ‘हिंदु राष्ट्राचा झेंडा आहे’, असे म्हणतो.

५. त्याला स्वयंपाक शिकण्याचीही आवड आहे.

२ इ. आज्ञापालन

१. मला सेवेला जायचे असेल, तर मी त्याचे नियोजन सहसाधिकेच्या घरी करते. तेव्हा तो तेथे थांबतो आणि त्यांनी सांगितलेले सर्व ऐकतो.

२. एकदा त्याला शाळेत कोणत्याही एका सणाविषयी ५ मिनिटे बोलायचे होते. मी त्याला ‘हिंदु नववर्ष – गुढीपाडवा’ या सणाविषयी बोलायला सांगितले. प्रथम त्याने ते स्वीकारले नाही. तेव्हा मी त्याला सांगितले ‘‘असे करणे, ही तुझी समष्टी सेवा आहे.’’ तेव्हा त्याने ते ऐकले आणि तो विषय शाळेत व्यवस्थित मांडला.

२ ई. जिज्ञासू वृत्ती : एकदा माझे आजी-आजोबा (श्री. आणि सौ. श्रीपाद हर्षे) आमच्या घरी आले होते. ‘आपले पणजोबा समष्टीसाठी उपाय आणि जप शोधण्याची सेवा करतात’, हे त्याला कळल्यावर ‘पणजोबा, मला दूरदर्शनवर कार्यक्रम बघायला पुष्कळ आवडते आणि ते सारखे पहावेसे वाटतात. ती आवड अल्प करण्यासाठी मी कोणता जप करू ?’, असा त्याने प्रश्‍न विचारला.’ – सौ. अंशू अजित संत

२ उ. सेवेची आवड : ‘त्याला सेवेची आवड आहे. मी त्याला सनातनचा साहित्य साठा मोजायला दिला. त्याने सेवा पूर्ण होईपर्यंत मला साहाय्य केले.’ – श्री. गिरीश आगरकर (मोक्षचे आजोबा)

२ ऊ. चुकांविषयी गांभीर्य असणे

१ ‘सत्संगात किंवा समष्टीत चूक सांगतांना मला रडायला येते. त्या वेळी मोक्ष मला सांगतो ‘‘आई, तू पुन्हा चूक केलीस ना ? मग रडू नकोस. तू प्रायश्‍चित्त घे.’’ – सौ. अंशू अजित संत

२. ‘तो मला त्याचा व्यष्टी आढावा देतांना चूक सांगतो. त्याचा आढावा ऐकतांना ‘कुणी मोठी व्यक्ती आढावा देत आहे’, असे वाटते. तो त्याच्या चुकांच्या नोंदी करतो.’ – सौ. संध्या आगरकर

३. मोक्षविषयी शाळेतील शिक्षिकांनी काढलेले गौरवोद्गार !

अ. ‘आम्ही त्याच्या शाळेत पालकांच्या बैठकीला गेलो होतो. त्या वेळी त्याच्या शिक्षिकेने त्याचे कौतुक केले आणि सांगितले ‘‘मोक्षसारखे विद्यार्थी अनेक वर्षांतून एकदाच मिळतात. असे विद्यार्धी मिळणे, हे आमचे भाग्य आहे. त्याच्यात काहीतरी विशेष आहे.’’

आ. त्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात त्याच्या शिक्षिकेने त्याच्याविषयी सांगितले, ‘‘याची कल्पनाशक्ती एखाद्या घारीसारखी पुष्कळ उंच उंच भरार्‍या मारत असते.’’

४. स्वभावदोष

​हट्टीपणा, मोठ्या आवाजात बोलणे, नकारात्मक विचार करणे, आवड निवड असणे.’

– सौ. अंशू अजित संत, बडोदा, गुजरात. (१.६.२०२०)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

​‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले