गोव्यात दिवसभरात ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३१४ नवीन रुग्ण
पणजी – गोव्यात १६ मे या दिवशी ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र ९९ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ८७७ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ३१४ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३३.८९ टक्के झाले आहे. दिवसभरात ३ सहस्र ७९३ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १४९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ५२२ ने घटून २८ सहस्र २५२ झाली आहे.
राज्यातील १० आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण
राज्यातील १० आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यात सर्वाधिक मडगाव येथे २ सहस्र १४८ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कांदोळी १ सहस्र ६३०, फोंडा येथे १ सहस्र ५६१, पणजी १ सहस्र ४८५, कुठ्ठाळी १ सहस्र ३३२, पर्वरी १ सहस्र २१५, चिंबल १ सहस्र १५७, म्हापसा १ सहस्र १५४, पेडणे १ सहस्र ११७ आणि शिवोली १ सहस्र १२, अशी आरोग्यकेंद्रागणिक रुग्णसंख्या आहे. सांखळी आरोग्य केंद्रात ९९२ रुग्ण आहेत.