गोमेकॉमध्ये आणखी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
पणजी (गोवा) – येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात १५ मेच्या रात्री ८ कोरोनाबाधित रुग्णांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत अशा प्रकारे ८३ जणांना मृत्यू झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दावा केला आहे की, हे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे होत नसून रुग्ण गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती झाल्यावर उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू होत आहे. गोव्यामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, असा दावाही त्यांनी केला.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे नाही, तर न्यूमोनियामुळे मृत्यू ! – रुग्णालय अधिष्ठाता
गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एम्. बांदेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत झालेल्या लोकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे नाही, तर न्यूमोनियामुळे झाला आहे.
देशात चाचणी सर्वाधिक रुग्ण सापडण्यामध्ये गोवा अग्रेसर !
गोव्यामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांत ५८ जणांचा मृत्यू झाला. गोव्यामध्ये कोरोनाची चाचणी केल्यानंतर ४२ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ही टक्केवारी देशात सर्वाधिक आहे.