अमरावती येथील आधुनिक वैद्य संदेश गुल्हाणे ‘स्कॉटिश’ संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे पहिले खासदार !
अमरावती – शहरातील रहिवासी आणि सध्या ‘स्कॉटलंड’ येथे वैद्यकीय सेवा देत असलेले आधुनिक वैद्य संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच ‘स्कॉटिश’ संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. या संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. आधुनिक वैद्य संदेश यांच्या यशाने राज्यासह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांनी पूर्व ‘किल्ब्राईड’मधील रुग्णालयात ‘ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार’ म्हणून काम चालू केले. वैद्यकीय सेवेसमवेतच त्यांनी विविध क्षेत्रांत कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. वर्ष २०२१ मध्ये स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ‘ग्लासगो पोलॉक’ मतदारसंघातून त्यांची उमेदवारी घोषित केली. ‘स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह’ आणि ‘युनियनवादी पक्षा’कडून आधुनिक वैद्य संदेश हे खासदार म्हणून निवडून आले.
I hope you have all enjoyed my insight behind the scenes at Parliament from a brand new MSP
This is my oath ceremony
I am so proud to be the first Indian heritage male elected as an MSP
Thank you to the voters of Glasgow, the activists and my family.
I want I make you all proud pic.twitter.com/Vd1yO9od1I— Dr Sandesh Gulhane MSP (@Sandeshgulhane) May 13, 2021