श्रीनगरमध्ये इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्या २० जणांना अटक
काश्मीरमधील धर्मांध त्यांच्या धर्मबांधवांसाठी काश्मीरमध्ये आंदोलन करतात, तर भारतातील हिंदू इस्लामी देशांतील हिंदूंसाठी सोडाच, भारतातील पीडित हिंदूंसाठीही काही करत नाहीत, हे लक्षात घ्या !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्या २० धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. काश्मीर खोर्यात पॅलेस्टाईनच्या सूत्रावरून कुणी सामाजिक माध्यमांतून पोस्ट प्रसारित करून येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.
Police have detained 20 persons for holding pro-Palestine protests in Kashmir
(@mirehsankhaliq reports) https://t.co/ZXBxQFcZMl
— Hindustan Times (@htTweets) May 16, 2021