समाधानी आणि स्वीकारण्याची वृत्ती असणारे श्री. निखिल पात्रीकर !
श्री. निखिल पात्रीकर यांचा तिथीनुसार वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (१७.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. निखिल पात्रीकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. इतरांना समजून घेणे
‘आमच्या लग्नाला २ वर्षे झाली. आम्हा दोघांमध्ये काही प्रसंग झाला, तर ते मला समजून घेतात.
२. त्यांना कुणी ‘तू बारीक आहेस’, असे म्हटले, तरी राग येत नाही.
३. समाधानी वृत्ती
‘त्यांना कधी काही वस्तू हवी का ?’, असे विचारले, तर ते ‘नको’ म्हणतात. ते आहे त्या स्थितीत समाधानी असतात.
४. इतरांना साहाय्य करणे
त्यांना स्वयंपाकाची आवड आहे. ते घरी काही वेळा पदार्थ बनवतात, ते सर्वांना आवडतात. ते आश्रमात अल्पाहार सेवा करतात, तेव्हा त्यांनी केलेला पदार्थ आश्रमातील साधकांना आवडतो. त्यांच्याकडे कुणी साहाय्य मागितले, तर ते त्यासाठी नेहमी सिद्ध असतात. आई-बाबांनी सांगितलेली कामे ते तत्परतेने पूर्ण करतात.
५. आध्यात्मिक त्रास होत असतांना पत्नीला आध्यात्मिक स्तरावर हाताळणे आणि नामजपादी उपायांसाठी साहाय्य करणे
लग्नानंतर माझा आध्यात्मिक त्रास वाढला आहे. तेव्हापासून त्यांनी मला आध्यात्मिक स्तरावर हाताळले आहे. मला त्रास चालू झाल्यावर ते माझी स्थिती समजून घेतात. मला उपायांची आठवण करून देतात आणि काही वेळा ते माझ्यासाठी नामजपादी उपायही करतात.’
– सौ. नमिता पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |