रावणाचे उदात्तीकरण करणार्या श्रीलंकेतील धार्मिक कृती !
हिंदूंचा धर्मग्रंथ रामायण यातील रावणाची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यानुसार रावण लंकेवर (सध्याच्या श्रीलंकेवर) राज्य करत होता. रावण हा फार शक्तीशाली राजा होता; मात्र त्याच्यातील तीव्र अहंभावामुळे दुसर्याची पत्नी पळवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. आपण सर्व जाणतो की, श्रीरामाने रावणावर विजय मिळवून धर्माची स्थापना केली. त्यानंतर बिभीषणाने श्रीलंकेवर राज्य केले. त्यामुळे श्रीलंकेला बिभीषणभूमी, असेही संबोधले जाते. त्या संदर्भात लक्षात आलेले सूत्रे –
दोन युगे संपली, तरी रावणाने लंकेवर राज्य केल्याचा इतिहास श्रीलंकेमध्ये विसरला गेला नाही. श्रीलंकेच्या काही भागांमध्ये रावणाला आदर्श ठरवून त्याची पूजा केली जात असल्याचेही आढळते. – एक साधिका