पंजाबमधील मुसलमानबहुल असणारे क्षेत्र स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित !
काँग्रेस सरकारकडून मुसलमानांना ईदनिमित्त भेट !
देशातून काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आले असतांनाही तिचे मुसलमान लांगूलचालन करण्याचे प्रयत्न अद्यापही सुटत नाही, हे यातून लक्षात येते ! अशा काँग्रेसला हिंदूंनी आता इतिहासजमा करण्याचीच आवश्यकता आहे !
चंडीगड – ईदच्या निमिताने पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यातील मलेरकोटला हा मुसलमानबहुल भाग स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला आहे. यामुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आता २३ झाली आहे.
#Punjab‘s only Muslim-majority town #Malerkotla declared as new district on #EidulFitr#eidmubarak2021 #EidAlFitr https://t.co/NjOfT8pvj2
— DNA (@dna) May 14, 2021
१. मलेरकोटला या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ६९ टक्के, हिंदूंची लोकसंख्या २० टक्के आणि शिखांची लोकसंख्या केवळ ९ टक्के होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार या नव्या जिल्ह्यात मुसलमानांची ८० टक्के लोकसंख्या होती, आता या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के झाली आहे.
२. अशा प्रकारे या भागाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्माण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री कॅप्टन सिंह यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते, त्याची पूर्तता त्यांनी ईदच्या दिवशी केली. या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, महिला महाविद्यालय, बस स्टॅन्ड आणि महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे यांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.