इस्रायलच्या विरोधात ५७ इस्लामी देशांच्या ओआयसी संघटनेची १६ मेला बैठक
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष
हिंदूंनो, मुसलमानबहुल पॅलेस्टाईनच्या साहाय्यासाठी ५७ इस्लामी राष्टे्र धावून येतात, याउलट संकटकाळी तुमच्या साहाय्याला धावून येण्यासाठी जगात एकही हिंदु राष्ट्र नाही, हे जाणा आणि आता तरी जात, पद, पक्ष आदी बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
तेल अवीव (इस्रायल) – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील ५७ इस्लामी राष्ट्रांच्या ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन’ (ओआयसी) या संघटनेने १६ मे या दिवशी या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. याविषयी ओसायसीने ट्वीट करून माहिती दिली आहे.
The Organization of Islamic Cooperation (#OIC), upon the request of the State of #Palestine, will on 11 May 2021 convene an emergency meeting of Permanent Representatives to discuss the escalating #Israeli aggression in Al-Quds. Read more: https://t.co/EbaWczLVZ8 #AlAqsaMosque pic.twitter.com/pLhcyHWgej
— OIC (@OIC_OCI) May 10, 2021
१. सौदी अरेबियाच्या मागणीनुसार संघटनेच्या कार्यकारी समितीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या स्तरावरील बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जेरूसलेममध्ये अल अक्सा मशिदीमध्ये झालेली हिंसा आणि पॅलेस्टाईन भागात इस्रायल करत असलेले आक्रमण चर्चा केली जाणार आहे.
२. इस्रायलच्या विरोधात इस्लामी देशांना एकत्र करण्यामागे तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांनी प्रयत्न केले आहेत. तुर्कस्तानने म्हटले आहे की, इस्लामी देशांना गाझा पट्टीतील हमासच्या मोहिमेला एकजुट होऊन पाठिंबा द्यायला हवा. इस्रायलच्या विरोधात आता स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
३. इस्रायलच्या विरोधात इस्लामी देश संघटित होत असतांना इस्रायलच्या सैन्याने पॅलेस्टाईनवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये आतापर्यंत ११९ लोक ठार झाले आहेत, तर इस्रायलमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
४. संयुक्त राष्ट्रांनुसार गाझा पट्टीतील जवळपास २०० हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेकडो लोकांनी उत्तरेकडील गाझा पट्टीतील शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. इस्रायलच्या ज्यू आणि अरब मिश्रित भागात अर्धसैनिक दले तैनात करण्यात आली आहेत. तिथे दंगल चालू झाली आहे.
५. इस्रायल सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कोनरिकस यांनी सांगितले, ‘आम्ही १६० लढाऊ विमाने, पायदळ सिद्ध ठेवले आहेत. रणगाड्यांनी काही विशेष लक्ष्य ठेवून मारा केला आहे; परंतु आम्ही अद्याप गाझा पट्टीमध्ये घुसलेलो नाही.’ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘मोहिम चालू होण्यास काही वेळ लागणार आहे. या वेळी हमासला चांगलाच धडा शिकवला जाणार आहे.’