पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘ऑनलाईन’ बैठक झाली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली, सातार्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून हे चिंताजनक आहे. त्यामुळे अधिक सतर्क रहाण्याची आणि आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबवण्याची आवश्यकता आहे. रुग्णसंख्या रोखण्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.’’