१६ मेपासून येणार्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वीज आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा सुरळीत रहाण्यासाठी नियोजन करण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या सूचना
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – भारतीय हवामान खात्याने १६ ते १८ मे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रामध्ये अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा वेग आणि दिशा अजून निश्चित नसली, तरी प्राथमिक अंदाजानुसार गोवा आणि दक्षिण कोकण किनार्याला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चक्रीवादळाच्या काळात जिल्ह्यातील विद्युत् पुरवठा विशेषतः रुग्णालयांचा विद्युत पुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरील सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.