कोरोनासारख्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सांगली येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यान
सांगली – सध्याच्या कोरोना संसर्गाच्या वाढत्या परिस्थितीचा लाभ उठवून धर्मांध विविध प्रकारच्या जिहादद्वारे हिंदु धर्मावर आघात करत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आत्मबळ वाढवण्यासाठी धर्माचरण करून संघटित होणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरीकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी केले. या व्याख्यानाचा लाभ येथील ३२० धर्मप्रेमींनी घेतला. या वेळी सहभागी झालेल्या धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय व्यक्त केले.
अभिप्राय
सौ. तेजश्री खवाटे, गावभाग (सांगली) – सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनाने पुष्कळ प्रसन्न वाटून एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली.
श्री. विनय लोखंडे – सध्या सर्वांचीच मनःस्थिती अस्थिर झाली आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना समजेल, अशा पद्धतीने सद्गुरु ताईंनी योग्य पद्धतीने विषय समजावून सांगितला.
श्री. विभूते, नायब तहसीलदार – जेव्हा मन ‘कमकुवत’ असते, तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा मन ‘संतुलित’ असते, तेव्हा परिस्थिती आव्हान बनते आणि जेव्हा मन ‘खंबीर’ असते, तेव्हा परिस्थिती एक संधी बनते. हा सर्व खेळ मनाचा आहे. त्यामुळे मन खंबीर बनवण्यासाठी भगवंताची उपासना अन् साधनाच उपयोगी पडते, हे या व्याख्यानातून लक्षात आले.
हेमांगी कुलकर्णी – या व्याख्यानातून साधना करणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले.
एक अधिकारी, सोलापूर – कार्यक्रम पुष्कळ छान झाला. मी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारी सर्व चर्चासत्रे ऐकतो. सद्गुरु ताईंनी करण्यास सांगितलेला नामजप मी कार्यालयातील संगणकावर लावून ठेवीन, तसेच सर्वांना त्याचे महत्त्व सांगेन. केवळ माझ्याच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये प्रत्येक संगणकावर हा नामजप लावीन.