मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट !
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची १४ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात चालू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तेथे पोचले होते; मात्र तेथे त्यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हेही उपस्थित होते. ही भेट २० मिनिटांची होती. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाविषयक विविध तक्रारी न्यायालय ऐकून घेत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात आहे.