चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अटकेतील गुंडाने केलेल्या गोळीबारात २ गुंड ठार !
पोलिसांकडून गोळीबार करणारा गुंड ठार
|
चित्रकूट (उत्तरप्रदेश) – येथील कारागृहातील दोन गटांत झालेल्या गोळीबारात दोन गुंड बंदीवानांचा मृत्यू झाला. यातील एक कुख्यात गुंड आणि आमदार मुख्तार अन्सारी याच्या जवळचा होता. पोलिसांनी गोळीबार करणार्याला या वेळी गोळीबार करून ठार केले.
UP: Three killed in gang war inside Chitrakoot Jail, police kill sharpshooter after he shot dead two gangstershttps://t.co/vUrqQEu0kM
— OpIndia.com (@OpIndia_com) May 14, 2021
सुलतानपूर कारागृहातून चित्रकूट कारागृहात नुकतेच स्थलांतर केलेल्या अंशु दीक्षित या गुंडाने हा गोळीबार केला. यात मुकीम काला आणि मेराज हे दोन गुंड ठार झाले. मेराज हा कुख्यात गुंड अन्सारीच्या जवळचा होता. अंशु याने या दोघांना ठार केल्यावर त्याने ५ बंदीवानांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी त्यांना सोडण्याचे आवाहन करूनही त्याने त्यांना न सोडल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अंशु ठार झाला.