जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास गुन्हा नोंद करण्याची बेळगाव जिल्हाधिकार्यांची चेतावणी
बेळगाव – दळणवळण बंदीच्या कालावधीत काही दुकानदार जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. तसे केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे, किरकोळ, घाऊक व्यापारी यांना सूचना दिल्या आहेत.