इस्रायलच्या प्रत्युत्तरात ‘हमास’चे ११ कमांडर ठार

तेल अविव – इस्रायलने पॅलेस्टाइनच्या आक्रमणाला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ११ कमांडर, तर पॅलेस्टाईनचे ७० नागरिक ठार झाले. इस्रायलनेही स्वतःचेे ६ नागरिक मारले गेल्याचे सांगितले. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्राने युद्ध पेटण्याची भीती व्यक्त केली आहे. सर्वप्रथम हमासकडून इस्रायलवर १ सहस्र ५०० रॉकेटद्वारे आक्रमणे करण्यात आली. प्रत्युत्तरात इस्रायलकडून लढाऊ विमानांद्वारे ‘एअर स्ट्राइक’ केला गेला. इस्रायलने १२ मे या दिवशी केलेल्या हवाई आक्रमणात गाझा पट्टीतील १४ मजली इमारत उद्ध्वस्त करण्यात आली.