मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी आंदोलन करणार !

यवतमाळ – प्राधिकरणाच्या वेतन भत्त्याची हमी सरकारने घेतली असली, तरी त्याची कार्यवाही होत नाही. कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीनंतरचे देयलाभ अनुमाने २ ते अडीच वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्राधिकरण वगळता जवळपास सर्वच शासनअंगीकृत अगदी आश्रमशाळासह सर्वांना ७ वा वेतन आयोग लागू झाला आहे; मात्र प्राधिकरण आजतागायत सातव्या आयोगाच्या प्रतीक्षेतच आहेत. तसेच ६ व्या वेतन आयोगातील आश्‍वासित प्रगती योजनेच्या अंतर्गत २४ वर्षांचा दुसरा लाभ मिळण्यापासूनही कर्मचारी वंचित आहेत. ३१ मेपर्यंत याविषयी शासन स्तरावर निर्णय न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे प्राधिकरणच्या कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.

सेवानिवृत्तीनंतरच्या देयलाभाच्या प्रतीक्षेत अनुमाने ७५ सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची जीवनयात्रा संपली, तर १५ सेवेतील कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. अशा प्रकारे कोरोनाच्या काळात ९० कर्मचार्‍यांचा बळी गेला आहे.