स्वतःच्या भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यामुळे मंत्र्यांना धमकी देणार्या सैनिकाविरुद्ध गुन्हा नोंद
उद्या अशा स्थितीमुळे देशात अराजक माजल्यास आश्चर्य वाटू नये !
रेवाडी (हरियाणा) – स्वतःच्या कोरोनाबाधित लहान भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने एका सैनिकाने गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री इंद्रजितसिंह यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सदर सैनिकाविरुद्ध येथील रामपुरा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
महामारी में टूट रहा सब्र:भाई को ऑक्सीजन नहीं मिली तो फौजी ने केंद्रीय मंत्री को गोली मारने की दी धमकी, वीडियो वायरल होने के बाद FIR दर्जhttps://t.co/F9EfnvWH2D #HaryanaFightsCorona #OxygenShortage #videoviral #CoronavirusIndia @Rao_InderjitS #RaoInderjitSingh
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 11, 2021
या सैनिकाने व्हिडिओमध्ये ‘माझ्या लहान भावाला कोरोनाची लागण झाली आहे असून त्याची प्रकृती गंभीर आहे. मला रेवाडीत शोधूनही एकाही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मिळाले नाही. गुरुग्राममधून मला ७० सहस्र रुपयांना ऑक्सिजन सिलिंडर घ्यावा लागला. यानंतर त्याने केंद्रीय मंत्री इंद्रजितसिंह यांना गलिच्छ भाषेत शिव्या देत वरील धमकी दिली.